STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

जीवन एक संघर्ष

जीवन एक संघर्ष

1 min
1.3K

जीवन एक संघर्ष आहे

अगणित शलाकां जळजळीत

येती कधी हिरव्या धरेवरी

तेवढीच सहिष्णुता येतसे तिच्यात..!!


जगण्याकरीता या आयुष्यात

त्याग,सहनशिलता करावी लागते

समाधानाचं बीज रूजवूनी

आनंदी आयुष्य फुलवावे लागते..!!


मस्त जगायचे स्वस्थ रहायचे

सुखाच्या जगाला नाही सोडायचे

काय मिळवलय काय गमवलय

शोधण्या आयुष्य नाही गमवायचे...!!


जन्म आपुला ही सुंदर भेट

त्याला सत्कर्मात फुलवायचे

आपल्या मेहनतीचे फळ कधी

मिळेल घाऊकच किमतीचे..!!


वरती आकाशात हरखूनी पाहू नये 

खाली जमिनीवरच गुंतूनी रहावे

अन् या काळ्या मातीतच आपुले 

संघर्षमयी पाय घट्ट घट्ट रोवावे..!! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational