STORYMIRROR

Pratibha Vibhute

Drama

3  

Pratibha Vibhute

Drama

जीवन एक रंगमंच

जीवन एक रंगमंच

1 min
303

जीवन एक रंगमंच आहे

चालता बोलता आविष्कार

अनेक मुखवटे धारण करी

आपणच जीवनाचे शिल्पकार


जन्मा येताच लिहीते सटवाई

ललाटरेषा आपल्या भाग्याची 

नाही चालवणार कोणी तुमच्या

 कठीण नौका ही आयुष्याची.


कधी सुख तर कधी दुःख

आठवणीचा जमला संच

वेळोवेळी निभावून भूमिका

कारण हा जीवन एक रंगमंच


सक्षम हवे भूमिका निभवण्यास

जीवनाचा जगण्याचा कस 

अनेक आव्हाने पेलताना

प्राशन करी आंबट,गोड रस


जीवनाचे चित्र रेखाटतो

आपण आहोत चित्रकार

कष्ट करून यश मिळवू

होऊ आपणच शिल्पकार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama