STORYMIRROR

Nalanda Satish

Tragedy Others

4  

Nalanda Satish

Tragedy Others

जीवन एक रंगभूमी

जीवन एक रंगभूमी

1 min
293

जीवन एक रंगभूमी

कधी एकपात्री कधी बहु पात्री

नाटक इथे रंगवायचं

परदा पडला खाली की

गुपचूप निघून जायचं


जीवन एक रंगभूमी

कधी एकांकिका तर कधी समूह

पात्रात रंग भरायचे

मंत्रमुग्ध होऊन 

जीवन हे जगायचे


जीवन एक रंगभूमी

प्रेमाने सुखे नांदयचे

असो अंतरी कितीही दुख्खे

परमार्थ जीवन सत्कर्मी लावायचे


जीवन एक रंगभूमी

कधी हास्याचे कारंजे कधी विनोदाचे फवारे

कधी नैराश्याचे सावज

ते कधी भरारीची पतंगे


जीवन एक रंगभूमी

बुडबुड्या सम पाण्यासंगे तरंगायच

आली लाट जोराची की

त्याच पाण्यात मिसळायचं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy