जीवन एक नाटक....
जीवन एक नाटक....
जीवन हे नाटकंच आहे,
तीन अंकाच..
नशिबी येते पात्र,
राजा किंवा रंकाच.....
सकाळ दुपार आणि रात्री,
अश्या तीन घंटा वाजतात...
बालपण, तरुणपण आणि वार्धक्य ,
ह्या तीन सावल्या असतात....
माणसाच्या आयुष्यात जसे,
चांगली वाईट लोकं येतात...
रंगमंचावर यांची जागा,
अनेक पात्र घेतात..
जसा नाटकाचा खेळ संपताच .....
पडदा खाली पडतो....
तसा, डोळ्याचा पडदा पडल्यावर,
आयुष्याचा हा खेळ संपतो......
