STORYMIRROR

Manisha Wandhare

Classics

3  

Manisha Wandhare

Classics

जीव वेडावला...

जीव वेडावला...

1 min
14

जीव वेडावला...

आषाढी कार्तिकीचा ध्यास लागे जीवा ,

विठ्ठला तुझ्या भेटीसाठी जीव वेडावला,

टाळ मृदंग वीणा वाजे जपली जपमाळा ,

आता दर्शन दे माऊली जीव वेडावला ...

भजन किर्तन ओव्या तुझ्या गाईल्या ,

वृदांवन घेऊनी डोई जीव वेडावला ,

भास तुझा लागला देवा पंढरीला येईल,

वारीत चालता चालता जीव वेडावला ...

रिंगण घालुनी वारकरी भक्ती तुझी करता,

अविट गोडी ऐकात्मतेची जीव वेडावला,

सावळ्या विठु माऊलींची ही माया ,

चित्त तुझ्या गावी देवा जीव वेडावला ...

तहान भूक हरली आता नको मज काही,

तुझ्या दर्शनासाठी उंबठ्यावर जीव वेडावला,

पाहता कळस उंच गारवा मनाला देई ,

अंत नको पाहू देवा जीव वेडावला...

ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचे अभंग ,

ऐकता भक्तीत माझा जीव वेडावला ,

शब्दांना येऊ दे माझ्या भक्तीचा सुगंध ,

तुझ्यासाठी लिहीता लिहीता जीव वेडावला...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics