जी हुजुरी
जी हुजुरी
कशी माणसाची बदलली नीती।
बदलल्या साऱ्या वागण्याच्या रीती।।१।।
दिसे कानाच्या खालचा जेव्हा कोणी।
अति मोद तेव्हा होई मनोमनी।।२।।
होई कनिष्ठांसवे किती मुजोरी।
सत्तावानांपुढे किती जी हुजुरी।।३।।
कधी जीवनी जी हुजुरी नसावी।
स्वाभिमान ऊरी खुमारी असावी।।४।।
भले आपली चाकरी सांभाळावी।
सुखे भाकरी मानाची मिळवावी।।५।।
नका आत्मसन्मान कुणाचा तोडू।
इथे माणसाला आदराने जोडू।।६।।