जिद्द माझी
जिद्द माझी
आजच्या गर्भात
माझे बीज आहे .....
उद्याच्या विश्वात
माझे रक्त आहे ......
सशक्त भारतासाठी
मीही सज्ज आहे .....
माझ्या चिमुरडी साठी
मी एकमेव उभा आहे ......
नको मला ही सहानुभूती,
नको कुणाचा हात......
मी एकटाच उभा आहे ,
माझ्या लेकीचा हा बाप.......
ना पडेन पाय कुणाचे,
ना पसरेन हात कुणाकडे.......
भविष्य हिचे उजळेल,
माझ्या हातून सुरक्षिततेकडे......
मीच रक्षण करता,
मीच तिचा पिता.......
वाढवीन मी हिला,
देइन बळ तीला......
सुखी संसार कर नाहीतर
घडविण देशासाठी तिला ......
जिद्द माझी, स्वप्न तिचे,
पूर्ण करेन, हे शब्द माझे.........
