STORYMIRROR

kishor zote

Inspirational

3  

kishor zote

Inspirational

झुंज

झुंज

1 min
27.4K


दयावी झुंज

सदा वाईट विचारांशी

आपण आपल्याशी

प्रामाणीक ॥१॥

घ्यावी झुंज

असो कशी परिस्थीती

झुकावी नियती

पायात ॥२॥

सोडवावी झुंज

मनातल्या त्या गुंत्याची

व्हावी मांगल्याची

पहाट ॥३॥

घडावी झुंज 

चांगले घडण्या काही

वाट पाही

प्रगती ॥४॥

संपेल झुंज

मनी दडली असुरी

भावना विषारी 

मिटत ॥५॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational