झरा
झरा
स्वच्छ, निर्मळ
झुळझुळ वाहे झरा
कड्यावरून कोसळताना फुलवे जणू तुषारांचा पिसारा
वार्यासवे ती पानांची सळसळ
रानातूनी वाहे झरा हा झरझर
शोभे माथ्यावरी
मुकुटापरी भव्य अंबर
राही सदा पाठीशी
त्याच्या उभा हा डोंगर
गवत तृणाचे तुरे मखमली
उडती फुलपाखरे
ही इवली इवली
उठून दिसे हिरवी रेशमी मऊशार गालीच्यावरती
ओढ अनामिक ही समुद्राच्या कुशीत विसाव्याची
खाऱ्या पाण्यात ही गोडी आपली मिसळायची
वाटे झुळझुळ वाहणाऱ्या झरया
काठी कधीतरी शांत बसावं
मुक्त बेधुंद वाहतांना
शिस्तीचा वसा न सोडता
दगड मातीच्या प्रवासात ही खळखळून वाहावं
आजूबाजूच्या झाडांना मंत्रमुग्ध
कधीतरी करून जावं
अंतरी सदैव प्रेमाचा
निर्मळ झरा ठेवून
या वाहणाऱ्या झऱ्याकडून बरंच काही शिकावं...
