झाडे लावा... झाडे जगवा...
झाडे लावा... झाडे जगवा...
झाडे लावा झाडे जगवा,
वृक्षसंवर्धनाचा हा पावा,
वृक्षराजीचा करा धावा,
बहुसंख्येने वृक्ष ती लावा..
झाडे लावा झाडे जगवा,
चळवळ ती गावागावा,
लावू नका नुसती नावा,
झाडांमध्ये विठ्ठल पहावा..
झाडे लावा झाडे जगवा,
वृक्ष ताे पावसात नहावा
पराेपकारी ताे सहावा
बहुगुणी उपयोग जाणावा..
झाडे लावा झाडे जगवा,
पाेहाेचवा ताे सांगावा,
विनंतीने सांगताे भावा
झाडे लावा झाडे जगवा..
