जगतो आहे ..
जगतो आहे ..
मी ही जगतो आहे ...
जिवनातल्या वादळांना
निधड्या छातीवर पेलूनी जगतो आहे..
शब्द आप्तांचे जरी असले तरीही विखारी ते
विखारी शब्द काळजावर झेलूनी जगतो आहे..
कटू येतआहे जे अनुभव ,
सारे अनुभव पचवूनी जगतो आहे..
स्वप्ने आल्हाददायक गारव्याची होती.
हल्ली रखरखते ऊन पिऊन जगतो आहे..
वाटते मला की वाहू नये भळाभळा रक्त भावनांचे..
म्हणुनी उरातल्या साऱ्याच जख्मा आता कवटाळूनी जगतो आहे..
द्यावे वाटते त्यागूनी लक्तरे या देहाची
अन सोडावे जगणं सुद्दा
पण तू जगतेस ना माझ्यासाठी
म्हणून मी ही तुझ्यासाठी जगतो आहे .
नव्हतीच बिषाद कुणाची कालपर्यंत
बोल मला , माझ्या कर्तुत्वाला लावण्याची ..
पण आज ऊणेदुणे साऱ्यांचेच
मी झेलूनी जगतो आहे..
कर्तुत्वावर माझ्याच जेंव्हा संशय केला गेला.
हिनपणा जेव्हा माझ्याच वाट्याला आला ..
गाळ द्वेषाचा तों सारा
ओढूनी जगतो आहे..
तू जगतेसना माझ्यासाठी
म्हणून मी ही जगतो आहे .
