STORYMIRROR

Manisha Awekar

Inspirational

4  

Manisha Awekar

Inspirational

जगावे भरभरुन

जगावे भरभरुन

1 min
326

क्षण आनंदे वेचावे

मोदे जीवन जगावे //ध्रु//


दैवदत्त लाभलेले

वरदान जीवनाचे

जगी कल्याण साधावे

मोदे जीवन जगावे    (१)


मिताहार घेऊनिया

कायाकल्प नितनूत

रोगशत्रू हटवावे

मोदे जीवन जगावे    (२)


दूर दूरच्या सहली

मित्रांसवे करायच्या

सुख आठवांचे घ्यावे

मोदे जीवन जगावे     (३)


कला क्रीडा साहित्याची

जाण असावी जीवनी

कलानंद फुलवावे

मोदे जीवन जगावे     (४)


दुःखे जाणी गरीबांची

धावी नित्य सहाय्यासी

स्वार्थ दूरचि ठेवावे

मोदे जीवन जगावे      (५)


श्रद्धा असावी अंतरी

नित्य परमेशावरी

नित्य सत्कर्म करावे

मोदे जीवन जगावे     (६)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational