जग
जग
काळे काळे सारे ऊरी भरून पाहीले
आपलेच पावसाळे सारे दूरून पाहीले
केंव्हा व्हावी पहाट ईथल्या काळरात्रीची
सुर्योदय थोडे थोडे खिडकीतून पाहीले
कुठली मुभा अशी ही जन्मठेप मिळाली
वर्षांचे गणित पुर्वी सारखे मांडून पाहीले
एक येतो भेटायला कबूतर खिडकीपाशी
मनातले सारे त्याला ही सांगून पाहीले
खिडकीस दिली लाच ओल्या हातांची
गज तीचे ही जरा मी हलवून पाहीले
ताटातले अन्न रोजच आता पचवायचे
पोटातल्या खळगीला समजावून पाहीले
करोनी बसलास चेतन जगीशी प्रेम असे
धोके जगाने दिलेले पचवून पाहीले
