जाऊ दे गं वेडे
जाऊ दे गं वेडे
जाऊ दे गं वेडे तुला
ते नाही कळणार
कोरड्या डोळ्यात तूझ्या
अश्रू नाही तरळणार ||0||
अपेक्षाच नाही तुझ्याकडून
प्रेम समजून घेण्याची
हतबल झालेल्या जीवाला
उमेद नवी देण्याची
द्वेषाची ही भिंत तुझी
कधी नाही ढळणार
कोरड्या डोळ्यात तूझ्या
अश्रू नाही तरळणार ||1||
कपाळमोक्ष केला तरीही
तुला ड्रामाच वाटणार
प्रेम तुझ्यासाठी माझ्या
हृदयात नाही आटणार
हृदयात तूझ्या माझी कधी
व्यथा नाही जळणार
कोरड्या डोळ्यात तूझ्या
अश्रू नाही तरळणार ||2||
विराजमान केलंय तुला
हृदयाच्या सिंहासनावर
तुझाच छाप आहे माझ्या
हृदयावर मनावर
तुझंच प्रेम धमन्यांतून
माझ्या सळसळणार
कोरड्या डोळ्यात तूझ्या
अश्रू नाही तरळणार ||3||
तुझं प्रेम मिळावं हा
अट्टाहास नाही
कधीतरी संपेल असा
हा प्रवास नाही
तुझ्याच प्रेमाने माझं
मन हळहळणार
कोरड्या डोळ्यात तूझ्या
अश्रू नाही तरळणार ||4||
कधी शोध घेऊ नकोस
प्रेम किती करतो मी
अंत नाही ज्याचा इतका
तुझ्यावर मरतो मी
कितीही दूर गेलो तरी
तुझ्याकडेच वळणार
कोरड्या डोळ्यात तूझ्या
अश्रू नाही तरळणार ||5||
