STORYMIRROR

Vikramsingh Chouhan

Inspirational

2  

Vikramsingh Chouhan

Inspirational

जागर

जागर

1 min
13.9K


भोळ्या भगतानं देवा मांडीला जागर

हिरंमाणिकाच मन आम्ही वाहतो फुल पान ।।धृ।।

देवांचा तू देव देवा पहिलं तुझं मान

दुर्वा मोदकांचा मान आम्ही वाहतो फुल पान ।।१।।

सबका मलिक एक म्हणती हिंदू मुसलमान

श्रद्धा सबुरीचा मान आम्ही वाहतो फुल पान।।२।।

शिवाजीची कुलस्वामिनी जागराला यावं

साडी चोळीचा तो मान आम्ही वाहतो फुल पान।।३।।

शाहू राजाची तू देवी जागराला यावं

खणा नारळाचा मान आम्ही वाहतो फुल पान ।।४।।

सात डोंगराची वणी जागराला यावं

हळदी कुंकुवाचा मान आम्ही वाहतो फुल पान।।५।।

हिपरग्याची जगदंबा जागराला यावं

भगव्या शेंदुराचा मान आम्ही वाहतो फुल पान।।६।।

चतृश्रुगी ची तू माता जागराला यावं

साखर फुटण्याचा मान आम्ही वाहतो फुल पान।।७।।

अमरावतीची तू अंबा जागरालायावं

गोड प्रसादाचा मान आम्ही वाहतो फुल पान।।८।।

गडावरच्या देवा तुम्ही जागराला यावं

खोबरं भांडाऱ्याचा मान आम्ही वाहतो फुल पान।।९।।

शेगावाच्या महाराजा तुम्ही जागरालायावं

पिठलं भारीचा मान आम्ही वाहतो फुल पान।।१०।।

विठे वरच्या देवा तुम्ही जागराला यावं

अबीर चंदनाचा मान आम्ही वाहतो फुल पान।।११।।

।।सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational