जागा रं
जागा रं
आया बायांनो जागा रं तुम्ही जागा रं ...
गल्ली असो की राजधानी दिल्ली रं
कुठही होऊ शकतो लैंगिक अत्याचार रं
कुठं वाटत नाही सुरक्षित जागा रं तुम्ही जागा रं
तुम्ही विद्यार्थिनी शिक्षिका गृहीणी रं
असता शाळेत बाहेर किंवा शेतात रं
पायी बस अणं रेल्वे प्रवासामधी रं
कुठं वाटत नाही ...
पाच महिन्याची निरागस बालिका रं
की जरजर नव्वदीची वृध्दमहिला रं
वासनाधांना वाटत नाही काहीच रं
कुठं वाटत नाही ...
जरी दहा वर्षाचं कार्ट शेबंड पोर रं
असो की म्हसणात गवऱ्या गेलेलं रं
कुणाच्या मनाचा नाही घेता येत ठाव रं
कुठं वाटत नाही ...
घटना घडल्यावर सहानुभूती येई पुर रं
मिडीया बातम्या प्रसार रात्रंदिस रं
लोक करी हळहळ बंद निषेध रं
राजकारणी मदतीसाठी चढाओढ रं
कुठं वाटत नाही ...
पालकांनो मुली महिलांना सक्षम करा रं
ताई माई आक्का कुंफु कराटे शिका रं
आत्मसंरक्षणासाठी सज्ज व्हा रं
संकटकाळी कुंटुब व पोलिसांना कळवा रं
आया बायांनो जागा रं
तुम्ही जागा रं
