STORYMIRROR

Sonam Thakur

Children

3  

Sonam Thakur

Children

जादूची दुनिया (बालगीत)

जादूची दुनिया (बालगीत)

1 min
87

जादूनगरीचा जादूगार

आला बसुनी घोड्यावर

त्याच्यासोबत मला नेलं

जादूच्या उंच आभाळवर


आभाळात होती सुंदर 

त्याची भव्य जादूनगरी

दिसायला होती ती

गंमतीदार खूपच न्यारी


त्या नगरीत जादूची शाळा 

होती मुलं जादुगार सारी

कोणी हवेतून चॉकलेट काडी

कोणी जादूने फुलं उधळी


जादूने कोणी आणे पिझ्झा

तो खाण्यात येई खूपच मज्जा

जादूच्या काठीची मज्जाच निराळी

तिच्यावर बसून फिरले मी नागरी सारी


मुलांचे तेथील खेळचं वेगळे

जादूचे चालती प्रयोग निराळे

कोणी हवेत उंच तरंगे

कोणी पाण्यावर्ती स्वच्छदं नाचे


अशा या जादूनगरीची मी किमयागार

सारे म्हणती मला जादूगार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children