जादूचा दिवा
जादूचा दिवा
हवाय मज एक जादूचा दिवा
घडवेल जो मज प्रवास नवा
शिकवेल जो मला उडणे
स्वच्छंदी निर्मळ जगणे
करेल दूर जो दुुःख सारे
चमकवेल जो आनंदाचे तारे
हवा आहे मज जादूचा दिवा
बनेल जो साऱ्याची दवा
विसरून टाकेल वेदना मनाच्या
पुुरवेल इच्छा जो साऱ्यांच्या
