STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

जादू कुंचल्याची

जादू कुंचल्याची

1 min
211

कल्पनेच्या कुंचल्याने

जग माझे मोहमयी

रम्य चित्र रंगविते

अंतरंगी रंगमयी


रत्नाकर अथांगसा

लाटा वेगे उसळता

क्षितीपार मन जाता

मोद मनी रेखाटता


गोड रमणी सुंदर 

वस्त्रे हरित रेशमी

अलंकार विभूषित

सुनयना राजेश्वरी


शुभ्र गिरीशिखरांसी

न्याहाळता कल्पनेने

रम्य कांचनसोहळा

नयनकमलांमधे


फुले मयूर पिसारा

घनमाला नभांतरी

रंगोत्सव सामावते

तृप्त मनी मन्मंदिरी


भाग्यवान परमेशा

कुंचल्याचे दान दिले

सुंदरशा चित्रमयी

दुनियेत रमविले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract