Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

शुभांगी कोतवाल

Abstract Inspirational

4.5  

शुभांगी कोतवाल

Abstract Inspirational

इवली

इवली

1 min
344


इवलिशी चिमुकली सर्वांची ती आवडती ,

सुंदर नितळ चेहरा जणू साईचं साजूक तूप ,


आई- बापाविनाची पोर होती सर्वांच्या जीवाभावाची ,

आजीआजोबा होते तिचा भक्कम आधार ,


पायातल्या सुंदर पैंजणाचा छम छम करत आवाज,

जाई रोज मंदिरात आजोबांबरोबर दर्शनाला ,


कळत नकळत झाली सर्वांच्या आकर्षणाचा विषय ,

खूप गोड दिसत असे ती इवली परकर - पोलक्यात !


चमकदार लुकलुकणारे डोळे आणि काळ्या कुरळ्या

 केसांचा जणू वाटे सर्वांनाच हेवा !


चपळ , चंचल व हुशार , सर्वांना हवीहवीशी वाटणारी,

होती जणू अवतरली एक परी होवून ती जमिनीवरी ,


हसरा निरागस चेहरा आणि नाजूक देहयष्टी , 

इथून - तिथे बागडताना दिसे जणू ताजं टवटवीत फूल , .


बघता बघता इवली आता झाली थोडी मोठी ,

 जाऊ लागली नर्सरी , केजीत ,आजीचा हात धरून ,


वर्षामागुन वर्ष सरली , इवली शाळा- कॉलेज शिकली ,

तल्लख बुद्धीची व खूप अभ्यासू होती ती म्हणूनच तर डॉक्टर बनली !


आणि सर्वांच्या कौतुकाचा , प्रेमाचा विषय झाली .

आजी- आजोबांची तपस्या सार्थक झाली ! 


"आजी मी लग्न नाही करणार " म्हणता म्हणता ,

एका देखण्या तरुण डॉक्टरच्या प्रेमापुढे हरली ,


आणि एके दिवशी तिच्या लग्नाची घडी आली ,

खूप सुंदर तेजस्वी दिसत होती ती वधूच्या वेशात ,

वर सुद्धा दिसला दिमाखदार राजबिंडा राजकुमार ,


थकलेल्या आजी- आजोबांनी नातीला दिला निरोप,

दुःखी पाणावलेल्या डोळ्यांनी पण समाधानी मनाने ,


सर्वांची आवडती इवली झाली इवल्याश्या बाळाची आई ,

थाटून संसार स्वतःचा , केला सांभाळ आजी - आजोबांचा ,

अशी होती ती इवली , सर्वांसाठी प्रेरणादायी !!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract