इतकेच मला जाता जाता कळले होते
इतकेच मला जाता जाता कळले होते
इतुकेच मला सरणावरती
जाताना कळले होते
सगळे काही राहणार इथेच
कोणी काहीच घेऊन जाणार नव्हते
सरणावरती शांत पडून होतो
रडणं पडणं चालू होतं
आयुष्यभर माझं माझं करत जगलो
शेवटी जाताना काहीच सोबत नव्हतं
वाईट वाटल ते आई बाबांचं
त्यांचा मोठा आधार गेला होता
त्यांना सोडून मी नसल्याचा
कोणाला काहीच फरक पडणार नव्हता
ज्यांना माहीत होतो मी
त्यांच्या डोळ्यात पाणी उभे होते
ज्यांना पटत नव्हते माझे
त्यांचे दुःख लटकेच होते
देह माझा तान्ह्या निरागस
बाळासारखा पडून होता निपचित
इथून पुढचा प्रवास माझा
जाणार होता अंधाराच्या कुशीत
धडधड करून जाळात
सगळे शरीर जळत होते
शेवटी इथवर सोबत असणारे
शरीरसुद्धा माझे नव्हते
मी जळत होतो समोरच
सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या
आयुष्याच्या रनांगणावरती माझ्या
आता पाऊलखुणा उरल्या नव्हत्या
संपला होता सगळा प्रवास
आयुष्य सगळं सरलं होतं
जळून सगळी राखरांगोळी झालेली
अंधाराशिवाय काहीच उरलं नव्हतं
आयुष्य गेलं फुकट
इथे कोणीच कोणाच नसतं
इतुकेच मला जातानां कळलं होतं
इतुकेच मला जातानां कळलं होतं
