इंधन दरवाढ
इंधन दरवाढ
कधी-किती वाढावे
नाही कुठे बंधन?
पेट्रोल-डिझेल दरवाढीचे
नित्य खिशाला चंदन.
कधीतरी वाढ होणारच
तेवढ्यापुरते आहे ठीक ;
गाडीचे average आता
रुपयाला एक कीक.
पेट्रोल-डिझेलच्या फटक्यांनी
रंगलाय दरवाढीचा खेळ;
'सेंच्युरी 'करता चढा- ओढीने
दोघांचा निर्धारी मेळ.
रुपयांनी वाढून पैशांनी कमी
होणारा इंधनाचा भाव;
तरीही सत्ताधारी आणतात
हो "अच्छे दिन" चा आव.
ही रेकॉर्डब्रेक दरवाढ
म्हणजे पाच वर्षांचा सूड;
व्यवस्थेच्या मनात काय
दडलंय हे गुलदस्त्यातील गूढ.
महागाईच्या या वणव्यात
जनतेच्या रक्ताचा सडा पडलाय;
लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या
लोकशाहीचा श्वास कोंडलाय.
