हुरहुरती सांज
हुरहुरती सांज


अशा सांजवेळी
कशी दाटते गं
हुरहुर मनी
सखे सांग ना गं
दूर मायदेशी
मम माय तात
अश्रू तरळता
धरिलास हात
वैभव सुखात
जरी संसारात
सय दाटे उरी
मम हृदयात
किती आठवणी
तुझ्या संगतीत
खेळ गप्पागोष्टी
चेष्टा मस्करीत
आले दूरवरी
तरी नच तुटे
प्रेम मैत्रबंध
अंतरात दाटे
तूच जाण माझ्या
उरातील सल
काय करु सांग
कधी भेटशील
पार अंतरासी
सत्वर करीन
येईल गं झणी
माहेरवाशीण
सौ. मनीषा आवेकर