हुंडा
हुंडा
पैश्याने स्त्रीचं मोल केलं जातं
हुंडा त्याला म्हणतात
कित्येक स्त्रिया यापायी
दुःखाने प्राण वेचतात
स्त्री म्हणलं की आला हुंडा,
हाच, ठरलेला आहे मोठा शाप
हुंड्यापायी कासावीस असतो
प्रत्येक निरागस मुलीचा बाप
आजही मला दिसतात
हुंडाबळीचे दुष्ट प्रकार
कित्येक मुलींनी हुंड्यापायी
पचवले आहेत असंख्य नकार
दिवस सरले, वर्षे सरली
हुंडाबंदी आला कायदा
आज ह्याच गोष्टीचा
सर्व स्त्रियांना होतोय फायदा
कोण जाणे, तो दिवस केव्हा येईल
हुंडा पूर्णपणे बंदीचा
त्यावेळेस, खऱ्या अर्थाने गाजेल
सूर सनई चौघड्याचा
