हसू
हसू
हसू येतं, अश्रूंच्या धारा दूर सारून
अन् आनंदाचा धारदार पाऊस घेऊन,
आपल्या उदासीनतेला दूर करून
नेहमी प्रफुल्लता चेहर्यावर ठेवून,
क्षणी लागतेच ते कायमचे
मनी घर करून वसू
कारण हेच असतं आपल्या
नजरेत सामावून
ओठावर ठसलेलं हसू.....
