हसता हसता रडलात तो दिवस
हसता हसता रडलात तो दिवस
दोस्तांची जमली
एकदा छान बैठक
विनोदांच्या फैरी
सुंदर जमली मैफल
विनोदांनी हसताना
अगदी पुरेवाट झाली
मनसोक्त हसताना
पोटदुखी सुरु झाली
विनोदांचे बाण
उडतच राहिले
हास्यकल्लोळात
डोळ्यात पाणी आले
आनंदानेही रडू येते
प्रथमच समजले
आलिंगन देऊन
एकमेकांना भेटले
