STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Inspirational

3  

Sakharam Aachrekar

Inspirational

हसत जगावे

हसत जगावे

1 min
11.9K

क्षण दोन सुख-दुःखाचे, जीवनाच्या पसेत घ्यावे

वळणावर या आयुष्याच्या, प्रत्येक पाऊली हसत जावे


उभ्या स्वच्छंदी शिवारातल्या, फुलासारखे फुलून जावे

अगणित दुःखावरती हसूनी, सुरेल जीवनगीत गावे


दुःखावरही हूडपणाने, हसून एकदा असे पाहावे

नशिबातले दुःख बोचरे, क्षणभर एके स्थळी थिजावे


आनंदाने घेऊन जावी, चूक भूल हसण्यावारी

गुंतून जाता एकमेकांत, फुलून येतील नाती सारी


रंगमंचावर या हास्याच्या, दोन क्षण निसटून जावे

विरणाऱ्या क्षणा क्षणासह, हास्य कोवळे उमटून यावे


मांडतो वाचक हो समोर तुमच्या, ही एकच माझी इच्छा

आयुष्यातल्या आव्हानांचा तुम्ही, हसत करावा पिच्छा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational