STORYMIRROR

Rajendra Udare

Inspirational Others

3  

Rajendra Udare

Inspirational Others

हसा

हसा

1 min
199

निरोगी राहायचं

आंनदी दिसायचं

समाधानी व्हायचं 

खूप खूप जगायचं

तर नक्की हसा ..॥१॥


खूप जोरजोरान

पोट धरून धरुन

अगदी टाळी देवून

लई मोठमोठ्यान

तर नक्की हसा ..॥२॥


दुसऱ्याच्या विनोदावर

स्वतः फसण्यावर 

विसराळू पणावर

काही आठवल्यावर

तर नक्की हसा ..॥३॥


एकटेही हसा 

चारचौघात हसा

सामूहिक हसा

गर्दीच्या जागी

तर नक्की हसा ..॥४॥


भल्या पहाटेला

सकाळी दुपारला 

तिन्हीसांजेला

मध्यरात्रीला

तर नक्की हसा ..॥५॥


सुटी रविवार

की शनिवार

असो सणवार

आठवडाभर

अन् आडवार 

तर नक्की हसा .. ॥६॥


संपूर्ण पृथ्वीतलावर

फक्त मनुष्य प्राणी

हसू शकतो कारण

ही ईश्वराची अनमोल

देणगी आपणास

तर नक्की हसा ..॥७॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational