STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract

3  

Sarika Jinturkar

Abstract

हरवली ती माणस..

हरवली ती माणस..

1 min
164

हरवली ती माणस

 एकमेकांचे सुखदुःख 

आपली मानणारी  


हरवली ती माणस 

 कवेत घेऊन मायेने गोंजारणारी


हरवली ती माणस

 चुकांवर हळूच चिडणारी  


हरवली ती माणस

 दुःख लपवून स्वतःसोबत

 इतरांना ही सावरणारी 


हरवली ती माणस

 क्षणात जवळ घेणारी 

हरवली ती माणस

 सुख सर्वांना वाटणारी  


हरवली ती माणस

 अंधारात वाट दाखवणारी 


हरवली ती माणस 

उजेडात साथ देणारी


हरवली ती माणस

 एकोप्याने राहणारी 

 हरवली ती माणस

 चटणी भाकरी खाऊन 

आनंदाने जगणारी  


हरवली ती माणस

 एकमेकांचा सन्मान करणारी

 

हरवली ती माणस

 थोरामोठ्यांचा आदर करणारी  


हरवली ती माणस

 मिटलेला नात्याचा बंध  

सर्वत्र संपलेला दिसतो आपुलकीचा गंध  


बघायला मिळते ती फक्त 

माणुसकी संपलेल्या

 माणसांची गर्दी  

हरवली ती माणस  

जी होती आपल्या जीवनातील

 कडू-गोड क्षणांनी 

भरलेली शिदोरी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract