STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Tragedy Fantasy

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Tragedy Fantasy

हरवलेल्या माझ्या मना ...

हरवलेल्या माझ्या मना ...

1 min
150

हरवलेल्या माझ्या मना ...

सापडशील का तू पुन्हा?

आहेस केतकीच्या बना?

की आहेस आंब्याच्या वना?


हरवलेल्या माझ्या मना ...

रूसण्याचा छंद तुझा जुना !

काय असा झाला गुन्हा ?

म्हणून रूसतोस पुन्हा पुन्हा?


हरवलेल्या माझ्या मना...

भरकटलेल्या काळ्या घना,

नाचू दे मोर केतकी बना;

प्रफुल्लित होऊ दे तना !


हरवलेल्या माझ्या मना...

झंकारू दे शारदेची वीणा

घे पदरी तू माझा गुन्हा;

ये परतून सत्वरी पुन्हा !!


हरवलेल्या माझ्या मना...

पुसून टाक रागीट खुणा

नको काढूस असा फणा

नको मोडू देऊस कणा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract