हरवलेलं अंगण
हरवलेलं अंगण
हरवलेलं अंगण
पुन्हा येणार नाही
सिमेंटच्या भिंतीत
हसू मिळणार नाही
गच्चीतल्या बागेला
अंगणाची सर नाही
जिन्यातल्या बागेला
कुंपणाची साथ नाही
दारावर सडा रांगोळीचा
अंगणात फुलांचा मेळ
आठवी मला माझे अंगण
घालताना फुगडीचा खेळ
असे हे अंगण
मिळेल का मला?
आठवून ते क्षण
मोहेल का मला?
जरी हरवले अंगण
अजूनही आठवी मज
तेच दिवस पाहून
नव्या पिढीस सांगे गुंज
