हरवलेली निरागसता
हरवलेली निरागसता
हरवलेली निरागसता
भोळंपण हरवले, हरवली निरागसता,
हुशारीच्या दुनियेत शोधू कुठे जिव्हाळा?
लाचारीने फेडले पांग या आयुष्याचे,
ओझे वाहताना मागे, राहून गेले जगणे.
नोटांसाठी भावनेचा दाबला मी गळा,
इच्छेपुढे दाटला कंठ माझा पुन्हा,
आली हरिणी माझी संगे पाडसाला घेऊन,
रंगलेली ही दुनिया, अंग फाटकं घेऊन.
झाली कडा माझी ओली, फाटले हे काळीज,
अंग झाकाया आकाश, ऊब द्यायला धरणी,
नाही आधार कोणाचा, झोळी माझी रिकामी,
होती ओळख कामाने, अस्तित्व तुझे काय रे?
नाशिवंत देहासाठी कुंपणाची धाव का रे?
करू बरोबरी कोणाची, देहाची की कपड्यांची?
की त्या मोठ्या गाड्यांची, का जगू समाधानाने?
सुखांच्या या लहरीत, आनंदाच्या गारव्यात...
सांज वेळ ती सरली, सकाळ प्रसन्नतेने भरली,
राहू दे भोळेपण आता, निरागसता ती उरलेली!
* कवी कलीम शेख
