जीवनाची सावली
जीवनाची सावली
जीवनाची सावली
सावली देणाऱ्या माणसा कशाला?
हात हे कुऱ्हाडी तोडता कशाला?
घरे उघडी पडली आज रानावनात,
आश्रय बिचाऱ्या पाखरा कशाला?
सावली उद्याला मिळणार नाही,
मागता उन्हात उन्हाळा कशाला?
श्वास घ्यायलाही मग झुंजावे लागेल,
कापता स्वतःचाच गळा कशाला?
काँक्रीटचे जंगल उभे केले जरी,
शोधता वनात मग मळा कशाला?
श्वास गुदमरला या हवेत आता,
दोष मग देता या हवेला कशाला?
पेटला वणवा आटली ही धरा,
स्वार्थाच्या देव्हाऱ्यात देव पुजता कशाला?
झाडे लावून 'कलीम' जग वाचवूया आता,
पाण्यासाठी मग सुकवता हा झरा कशाला?
कवी कलीम शेख...
