STORYMIRROR

Kalim Shaikh

Tragedy Inspirational Others

4  

Kalim Shaikh

Tragedy Inspirational Others

अस्तित्वाचा प्रवास

अस्तित्वाचा प्रवास

1 min
2

अस्तित्वाचा प्रवास

झिरपणाऱ्या पाण्यात उगवले कोंब आयुष्याचे,
सुंदर नक्षीकामात आकारले देह मनुष्याचे,
अंधाऱ्या कुशीतून बाहेर येताना
खेळले डाव पराकाष्ठेचे,
पहिल्या श्वासासाठी रोवले पाय अस्तित्वाचे.


शून्यातून निर्मिले अस्तित्व माझे
कल्पनेतून तुझ्या साकारले,
जन्म मृत्यू अटळ सत्य, या मध्यात जगणे हाच माझा प्रवास रे!
चाहूल लाभली सुखाची, दुःखाचे खडतर रस्ते आले,
वाकड्या तिकड्या, वळणाच्या रेषांनी, कोरड्या आयुष्यात रंग भरले.


अनुभवांच्या गाठोड्यात, सुरकुत्यांचे भंडार आहे.
घाव छिन्नी हातोड्याचे, मूर्ती आता, साकारली आहे.
सुखाच्या प्रवासाला, जोड हवी, दिशेची.
दिशाहीन जगणे केवळ, आहे एक भटकंती.


पेरलेल्या धान्याचे सजल कोठार जरी
ओढले ताशेरे आठवणीच्या ओघात जरी
चालत राहतो प्रवास आयुष्याचा सदा
क्षणा-क्षणाचा आनंद घे हीच साद पुन्हा!



- कवी: कलीम शेख


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy