STORYMIRROR

Kalim Shaikh

Tragedy Inspirational Others

4  

Kalim Shaikh

Tragedy Inspirational Others

जीवनप्रवास

जीवनप्रवास

1 min
1

           जीवनप्रवास 

दवबिंदूच्या एका तरल थेंबातून
देवा, देहाचे सुंदर शिल्प कोरलेस तू,
गर्भाच्या अंधाऱ्या कुशीतून बाहेर पडताना
पहिल्या श्वासासाठी अस्तित्वाचे पाय रोवले मी. 

शून्यातून निर्माण केले अस्तित्व माझे
तुझ्याच एका सुंदर कल्पनेतून अवतरलो,
जन्म आणि मृत्यू हे तर अटळ सत्य आहे
पण या दरम्यानचे जगणे, हाच माझा प्रवास रे! 

कधी सुखाची सुखद चाहूल लाभली
तर कधी दुःखाचे खडतर रस्ते आले,
या वाकड्या-तिकड्या वळणांच्या रेषांनीच
माझ्या कोरड्या आयुष्यात रंग भरले. 

चेहऱ्यावर पडलेल्या अनुभवांच्या या सुरकुत्या
हा जीवनाचा पराभव मुळीच नाही,
तो तर परिस्थितीच्या छन्नी-हातोड्याने
कोरलेला परिपक्वतेचा जिवंत इतिहास आहे. 

अनुभवांच्या या जड गाठोड्यातून
मी शहाणपणाचा एकच धडा शिकलो,
ध्येयाच्या पत्त्यावर सुखरूप पोहोचायला
प्रवासाला दिशा असणे खूप गरजेचे आहे. 

दिशाहिन जीवन तर केवळ एक भटकंती
ज्याचा अंतिम मार्ग फक्त अंधार आहे,
भूतकाळाच्या आणि आठवणींच्या गुंत्यात
स्वतःला सडवण्यात कसला आलाय सार आहे? 

हा हातोड्याचा प्रहार, हा रेषांचा खेळ
सर्व विसरून चालत राहायचे आहे,
घेऊन उराशी फक्त हाच एक क्षण
या क्षणाचा आनंद घेणे, हेच अंतिम जीवन आहे!

कवी कलीम शेख...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy