STORYMIRROR

Kalim Shaikh

Tragedy Inspirational Others

4  

Kalim Shaikh

Tragedy Inspirational Others

गावची ओढ आणि देवाचा विसावा

गावची ओढ आणि देवाचा विसावा

1 min
2

📜 गावची ओढ आणि देवाचा विसावा 📜
देवा सांजच्या येळला
ओशाळ मनानं बसलू होतू
जबाबदारीच वझ घेवून
पार वाकून गेलो बघा
किती ती मरमर
शांतताच नाही बघा
गाव ती गावच
पांदिची हिरवळ मन कस
प्रसन्न करतीया
मन पार तृप्त होऊन जातया
निसत पैसा पैसा नाही करत
गावखेड्याच लेकरू
माणसाच्या वस्तीत आनंदान नांदत असतं
ओसरी म्हणा कट्टा म्हणा
गप्पांच्या मैफिलीनं भरलेला असतो
तीथ मनाची घालमेल नसती
कसं हुईल बुवा आसती ती
फक्त ओढ, ती पण प्रेमाची
पण दुनिया तशी राहीली नाही बघा
असो,
देवाच्या नामात जी ताकद हाय
जी प्रेम हाय, शांती हाय
ती कशातच नाय पण
शहरात त्याला पण येळ नाही
इतभर जागा पण रात म्हणू देईना
ना पहाट, नीसती धावपळ
तुम्ही सोबत हाय पण घाईच जास्त हाय
समजून घ्यायला आमासनी येळच नाय
पिळून गेलो पण गोड रसाचा थेंब
तयारच होईना तर निघल कुठून
साथ राहू द्या कायम बाकी
काय बोलाव आम्ही
तुमचीच लेकरं हायती
आशेच्या हिंदोळ्यावर
गोंधळ सुरू आहे आमचा
म्हणून रस्ता चुकलाय आमचा
चला देवांच मुखी नाम घेवून जगू
आणि शेवटपण करू.
✍️ लेखक: कलीम शेख


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy