STORYMIRROR

Kalim Shaikh

Tragedy Inspirational Others

4  

Kalim Shaikh

Tragedy Inspirational Others

!! अस्तित्वाचा शोध !!

!! अस्तित्वाचा शोध !!

1 min
0

॥ अस्तित्वाचा शोध ॥

हा दगड शिल्पकाराच्या शोधात वणवण भटकतोय,
आशेच्या हिंदोळ्यावर, अपेक्षेच्या डोंगरावर स्वतःच अस्तित्व निर्माण करु इच्छितय...
पण शिल्पकाराची गल्ली ओस पडली आहे,
अहंकाराच्या आणि गर्वाच्या पाषाणात!
शोधमोहिमा सुरू आहेत,
कधी या अंगाने तर कधी त्या अंगाने...
परमेश्वरा, प्रकाश देण्यासाठी किती जळाव लागत रं?
अस्तित्वाच्या गाभार्यात स्वतःची लख्तरे सांडलेली पाहताना,
काळजाचे तुकडे वेचून पुढे जावे की स्वतःच्याच जखमेला कुरवाळत बसाव हिन भावनेने?
का झटकुन द्यावं व्यर्थ असलेल विचारांच वादळ?
ज्ञानाचा आणि आकलनाचा कटोरा तु काटोकाट भरून दिला,
पण या खडकाळ रस्त्यांनी स्वताःचच रक्त आणि कुरूद झालेल्या ओल्या जखमेकडे पाहत बसायच,
की समजूत काढायची समाधानाच्या मुखवट्यात?
या शरीराच महत्त्व आमच्यासाठी खुप आहे,
परंतु तुझ्यासाठी आमची ओळख म्हणजे 'कर्माचा पिठारा' आहे!
त्याच्याशिवाय उंची गाठता येत नाही,
आणि आमच्या सन्मानाची पावती आमच्यापर्यंत पोहचत नाही.
त्याच कर्माच्या पिठार्यातुन अस्तित्व आणि सन्मानाचा अंगारा दे,
होवूदे कल्याण आणि भाग्य उजळू दे,
माझ्या जगण्याला अर्थ प्राप्त होवूदे!
या दगडाला असा आकार दे की,
श्रध्देच तीर्थक्षेत्र म्हणून स्थान भेटेल.

- लेखक/कवी: कलीम शेख


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy