STORYMIRROR

Kalim Shaikh

Drama Inspirational Others

4  

Kalim Shaikh

Drama Inspirational Others

आयुष्याची भुमिका

आयुष्याची भुमिका

1 min
2

                    आयुष्याची भुमिका 

आयुष्यातल्या नाटकाचे पात्र निभावताना मी पुर्णपणे हतबल झालो 
कारण ते खर्या आयुष्यातले जगणे होते 
पण मी तिथे कुठेच उपस्थित नव्हतो 
होत ते माझ प्रतिबिंब 
माकडासारखा जगलो स्वतःची भुक शांत करण्यासाठी 
या फांदिवरून त्या फांदिवर 
झेप टाकत राहिलो 
शांत झाली भुक पोटाची पण मन मात्र उपाशीच होत 
रडण सौप्प होत पण हसवण खरच खुप अवघड होत 
आयुष्याचा बियांना दुष्काळाने तर कधी अवकाळी पावसाने झोडपल होत 
इच्छेचा फास घेवून अपेक्षेच्या मागे धावलो 
यशासाठी भावनेचा गळा दाबत गेलो 
आयुष्याच्या सुरकुत्यांनी अनुभवाची भिक्षा दिली 
फाटक्या झोळीत माझ्या कर्माची फळ आली 
हा खेळ खरच खुप विचित्र आहे 
कारण प्रत्येक वेळी केळी खायला भेटतील अस नाही 
कधीमधी सालीवरून घसरून पडाव लागत 
हसतील लोक हसू द्या मनात माझ्या आस आहे 
प्रगतीच्या शिखरावर माझी पण एक झोपडी आहे 
आयुष्य सुंदर आहे पण ते माझ प्रतिबिंब आहे 
साकारेन भुमिका मी उत्तम नटाची 
जमलच तर माफ करा हिच साद शेवटची
कवी कलीम शेख...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama