STORYMIRROR

Kalim Shaikh

Tragedy Inspirational Others

4  

Kalim Shaikh

Tragedy Inspirational Others

काव्य प्रवास

काव्य प्रवास

1 min
2

                         काव्य प्रवास 

कागदावर उतरताना भावनांच्या या काही ओळी,
कधी दाद मिळाली नाही, कधी मैफलही मुकी झाली. 

प्रसंग घडतो जीवनात, तेव्हाच शब्द सुचतात मला,
क्षणात लिहून काढतो मी, त्या तीव्र भावनेच्या ओघाला. 

लोकांना खिळवून ठेवेल, असा बाज अजून गवसला नाही,
माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना, अजून हवी तशी दाद मिळाली नाही. 

पण खचणार नाही 'कलीम', हा तर फक्त एक टप्पा आहे,
शून्यातून निर्माण होणाऱ्या, शिल्पकलेचा हाच तर शिक्का आहे. 

निसर्गरूपी मूर्तीकाराने, मलाही छन्नी-हातोड्याने घडवले आहे,
आजवरच्या या ठोकरांनीच, माझ्या शब्दांना धारदार केले आहे. 

अभ्यास करत जाईन मी, या वाकड्या-तिकड्या रेषांचा,
एक दिवस नक्कीच बदलेल सूर, माझ्या या काव्यप्रवासाचा!

कवी कलीम शेख 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy