STORYMIRROR

Kalim Shaikh

Romance Inspirational Others

4  

Kalim Shaikh

Romance Inspirational Others

सोबत मी असताना

सोबत मी असताना

1 min
2

सोबत मी असताना...!

घाबरतेस कशाला, हृदयात तुझ्या असताना
आधाराची काठी, सोबत कलीम असताना. 

तुझ्या मेहंदीत, आयुष्य माझे रंगले आहे
रंगाचा बेरंग होईल कसा, सोबत मी असताना. 

खुळ तुझं खुळखुळ, माऊली तुझ्यात पाहतंय
होईल सर्व ठीक, सोबत कलीम असताना. 

ज्योत बनुनी प्राणाची, अस्तित्व तुझं हृदयात आहे
उजळवाया घराला, लक्ष्मी रूपाने ये तू, सोबत मी असताना. 

तुझ्याविना संसार, वाटे नेहमी सुना
तू ये, ठणठणीत होऊन पुन्हा.
आलीस तू, आता हे विश्व माझे आहे
ये, गोड संसार उभारू पुन्हा. 

वादळात भोवरे गरगरले म्हणून
घिरट्या खाणं कोणी सोडतं का?
सोबत सारथी असल्यावर, लढणं कोणी सोडतं का? 

गंध आणि सुगंध माळले एकत्र पुन्हा
हर्षले तन, मोहिले मन पुन्हा. 

* कवी कलीम शेख


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance