STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

4  

Pandit Warade

Inspirational Others

हरवले ते ना सापडे

हरवले ते ना सापडे

1 min
209

जीवनाच्या सांजवेळी ग्रासते चिंता उद्याची

हरवले ते ना सापडे फक्त तडफड जीवाची ।।धृ।।


रम्य ते सुख बालपणीचे हौस मौज अन चैनीचे

खेळ क्रीडेमध्ये सरून गेले दिवस ऐन उमेदीचे 

फिरून नाही पुन्हा यायची गंमत लहानपणाची ।।१।।


सरले बालपण आले यौवन तलवारीसम तळपतो

'हिमालयाचे चूर्ण करीन' ही हिंमत हृदयी बाळगतो 

असे इथेच गरज तयाला जीवनातल्या संयमाची ।।२।।


आयुष्याची संध्या येता जाग येते या जीवाला

खूप राहिले करायचे पण वेळ न हाती उरलेला 

करू लागतो व्यर्थ धावपळ तीर्थक्षेत्र फिरण्याची ।।३।।


सकाळ, दुपार योग्यतेने ज्यांची ज्यांची संपली

सांजवेळी जीवनात मग चिंता न कशाची उरली

आलेला क्षण जगू मजेने गोडी येईल सौख्याची ।।४।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational