हृदय - एक शुष्क वाळवंट
हृदय - एक शुष्क वाळवंट
माझे हृदय वाळवंट
एक शुष्क वाटले ,
पाऊसथेंब पडून
काळे मेघ दाटले .
मी कोणाशीही नाही
कोणतीही गोष्ट बोलत ,
माझ्या मनातील भावना
कोणासमोरही नाही खोलत .
हल्ली हृदयातून माझ्या
अनेक आहेत भावना ,
आनंद आता मिळावा
हीच माझी कामना .
दुःख आले जर
जीवनात माझ्या ,
मनावर घेत नाही
करत नाही मी गाजावाजा .
दुःख नाही होत
मला कधीकधी ,
स्वतःच्या धुंदीत
जगतो मी अधीमधी .
हृदयात भावना माझ्या
चांगल्या असतात ,
तरीही माणसे मला
वाईट समजतात .
मन आपले संकटांत
नेहमी आनंदी ठेवा ,
चेहऱ्यावरचे हसणे पाहून
जगास वाटे तुमचा हेवा .
हृदय माझे आहे
भावनांचा सागर ,
आपुलकीच्या शब्दांनी
भरून घ्या मनाची घागर .
सत्यात हृदय हे
असते धडधडत ,
कवी कल्पनेत विचार
करताना धडपडत .
कोणतेच दुःख हृदयाशी
तुम्ही बाळगू नका ,
मनातील वाईट विचार
हृदयाच्या बाहेर टाका .
हृदयात माझ्या
आपुलकी असे ,
वागताना ती
सर्वांना दिसे .
संकटांत आनंदी राहण्याचा
माझा प्रयत्न असतो ,
पण काहीवेळा मी
भावनांच्या जाळ्यात फसतो .
चेहऱ्यावर हसू ठेवा
आराम द्या हृदयाला ,
चांगले विचार करून
आनंदी ठेवा मनाला .
मन आणि हृदय आपले
वाईट गोष्टीपासून ठेवा बाजूला ,
आनंदी राहून जगा आपल्या
सुंदर ह्या आयुष्याला
