होळी
होळी
विकारतेच्या सडापाण्याने
संस्कृतीची भूमी सारवली
प्रखलतेची रांगोळी रेखुनी
विनाशदृष्टीची होळी रचली
निराशेचे आवरण घेता
चिंतेच्या गोवरी मांडली
विध्वंसाचा कचऱ्या सवे
दुःखाची होळी पेटली
अहंकाराचे श्रीफळ वाहून
गोडीने शर्करा अर्पिली
शमण्या तुपाने साह्य करी
होळी ही द्वेषाची पुजली
मीपणाच्या पुष्पाने मग
वाहिली तव लक्ष वेली
कृतज्ञतेचा शेवटासाठी
होळी कुविचारांची प्रज्वली
