STORYMIRROR

Renuka D. Deshpande

Inspirational

5.0  

Renuka D. Deshpande

Inspirational

होळी

होळी

1 min
1.0K


रंगून सारे रंग रंगाने..

खेळू होळी प्रेम भावाने...

नाचत गाजत करु स्वागत होळीचे..

मनात चित्र साठवत पुरणपोळी चे...

मस्त खाऊ पुरणपोळी...

धुंद होऊन खेळू होळी..


ना भान असावे कशाचे..

भय ना राहावे जगाचे..

दहन करूया वाईट प्रव्रुत्तीचे..

प्रण घेऊ चांगल्या व्रुत्तीचे...

ना असावे कोणाशी वैर..


मस्त करावी रंगाची सैर..

रंगात रंगून खेळु मस्त रंग...

कधी ना व्हावे जिवनातील रंग भंग...

आशा करु संपेल सारे वैर..

ना राहील मग शत्रूची खैर..

दुष्मनी, वैर जाळून टाकू होळीत..


मग खरी मजा येईल मैत्रीत...

मैत्रीचा हात घेऊ हातात...

जीवनाची मजा नाही घातात...

सण न्यारा हा होळीचा..

स्वाद सदा आठवतो पुरणपोळीचा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational