STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Classics Children

3  

शुभांगी कोतवाल

Classics Children

होळी - सण

होळी - सण

1 min
186

होळी - शिमगा सण आनंदाचा 

    निरनिराळ्या रंगांचा 

भक्त प्रल्हाद याच्या विष्णु भक्तीचा 

  होलिका दहन व प्रहलादाच्या बचावाची

गोड - गोड पुरणपोळी व नैवेद्याची 

 लहान मुलांची होळी पेटण्याची वाट पाहायची 

त्यानंतर गरम - गरम पुरणपोळी जेवायची

"होळी रे होळी पुरणाची पोळी" म्हणायचा


   फाल्गुन पौर्णिमेला येणारा हा सण 

हिवाळ्यात बरोबर घेवून जाणारा 

  "होळी आली थंडी पळाली" म्हणायचा 

उन्हाळा सुरू होण्याची चाहूल देणारी 

   वसंतोत्सव साजरा करण्याची 

निरनिराळे रंग - एकमेकांवर उडवायचा सण 

  गुलाबी गुलालाची उधळण करायचा सण

उमंग , नवीन आशा घेवून येणारा सण 


रंगीबेरंगी वस्त्र धारण करून 

 आनंदोत्सव साजरा करण्याचा सण 

जात - पात, उच्च - नीच विसरून जायचा सण 

नवीन ऋतु , शेतातील नवीन पीक 

नवनवीन पदार्थ बनवून सहभोजन 

 व धुलीवंदनाच्या सण , मातीशी जोडले 

जाऊन उत्सव उजवण्याचा सण


 मनातील द्वेष - मत्सर विसरून 

नवीन चांगली सुरुवात करण्याचा सण 

रंगपंचमी उजावण्याचा सण 

मंदिरांमध्ये उत्सव - रास रचण्याचा सण ! 

प्रत्येक प्रदेशातील निरनिराळ्या रीती 

चाली व तऱ्हेतऱ्हेच्या रीती व

नवनवीन पदार्थ बनवून नैवेद्य बनवायचा सण 

पारंपारीक वेशभूषा व नृत्य सादर 

करून खूप आनंदाने साजरा करायचा सण



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics