STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

3  

Kishor Zote

Inspirational

होळी (सहाक्षरी)

होळी (सहाक्षरी)

1 min
241

अविवेकाची या 

करू होळी चला 

विवेक विचार 

स्वतःच्या बुद्धीला


धर्म माणसाला 

प्रगती कराया

अंधश्रध्देतया

नको ढकलाया


प्रश्न विचारून 

उत्तर मिळवा 

स्वतःचा विकास

स्वतःचा करावा


जुनी जळमटे 

फेकून दयावीत 

तोरणे विज्ञान 

घर सजवत


जळणे संस्कृती 

कधीच नसावी 

नात्यांची ती वीण

घट्ट अशी व्हावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational