STORYMIRROR

Prem Gaikwad

Action Inspirational

3  

Prem Gaikwad

Action Inspirational

होळी करा खुशाल

होळी करा खुशाल

1 min
151

होळी रक्ताची नाही

रंगांची व्हावी,

हिरवा, निळा, पिवळा,भगवा

नको तिरंग्यात पहावी.


उधळण रंगांची काय करता

ती गुणांची व्हावी,

शिकवण मानवता, बंधुता

एकतेची द्यावी.


बोंबलायचं तर बोंबला खुशाल

इथल्या अनिष्टते विरुद्ध

परिवर्तनात इमाने

सर्वांनी साथ द्यावी.


होळी दुर्गुणांची करा

करा अनिष्टतेचे दहन,

इतिहासात नोंद या

वर्तमानाची व्हावी.


होळी करा खुशाल

गुढी लावून यशाची,

दुःख, दैन्य, दारीद्रय, विषमता

त्यात जळून खाक व्हावी..


होळी करा तुम्ही

पाप आणि पापीष्टांची,

नीती मूल्यांची सदा

रुजवण इथे व्हावी.


अंधश्रध्दा, अज्ञानाची

सारे करू या होळी,

ज्ञानज्योती समाजात

तेवत सदा राहावी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action