Holi
Holi
मैत्री तुझी, माझी
सुवासिक फुलली,
सुगंधाचं लेणं जणू
प्रारब्धाने खुलली....
जीवनाच्या प्रवासात
हक्काचं कोणी नव्हतं,
मनाचं खातं नेहमी
रिक्तच राहीलं होतं....
तू आलास अनपेक्षित
मैत्री असावी कशी,
क्षणोक्षणी प्रचिती
अनुभूतीतून अशी....
विश्वास अन् प्रेमाचं
आपलं हक्काचं नातं,
जन्मोजन्मी मागेन
तुझ्याच नावाचं खातं....
नकारार्थी क्षणांना
स्थान आता नाही,
उमेदीची जगणं
सोडायचंच नाही.....
हातात हात घेऊन
संकटांवर करू मात,
तुझ्या सोबतीने उजळेल
आयुष्याची सांजवात....
