हो निडरशी आता तरी
हो निडरशी आता तरी


ओझे किती नेशील तू हो निडरशी आता तरी
भयमूक्त झाली पाहिजे नारी अशी आता तरी..
विरघळून या देहात मी झुरते किती सांगू कशी
हृदयात दडपण दाह घे समजूनशी आता तरी..
काटे, फुले, आयुष्य मी आता तुला जे मानले
कैफियत माझी मांडता तू जाणशी आता तरी..
रागावली माता जरी ठेवा मनी जागा तिची
प्रेमातल्या घरट्यात नाही सावशी आता तरी..
साकारुनी आत्म्यास या आसावली दुःखात मी
जगले कुठे माझ्यात मी शिकले तशी आता तरी..
तू चेतना बलिदान तू पण जाणते आनंद तू
निर्भया अशी हो ना इथे, का लाजशी आता तरी..
दुखाविले कोणी किती पाण्यातल्या कमळासही
सुखास नाही भार तो मग जागशी आता तरी..
जाणायचे अस्तित्व का, साधेच 'मीनाक्षी' तुझे
तू जाण साऱ्या त्या रिती, अन् थाटशी आता तरी..