हो ग खरंय ...
हो ग खरंय ...
हो ग खरंय हल्ली मी तुला टाळतोय ...
अन तू दिलेले क्षणच अजून कुरवाळतोय
नाही कसा म्हणू मी तू तर सारं काही जाणतेस
मी बोललेलं न बोललेलं , डोळ्यातून पाझरलेलं
हो ग हल्ली खूप एकटं - एकटं वाटतं तेंव्हा ...
आठवणी तुझ्या सोबत करतात, धीर देतात
तू नाहीस म्हणून काय झालं ? स्मृती तर आहेतच की
आठवतात तुझे ते शब्द नि शब्द अगदी जसेच्या तसे
हो ग आठवतं मला ,तू म्हणालीस होतीस जप स्वतःला
तू खूप हळवा आहेस, फार मनाला लावून घेत जावूं नकोस
लहान - सहान गोष्टीतूनही आनंद मिळवता येतो रे ...
असाच असतो जीवन प्रवास हवा - हवासा तर कधी जीवघेणा
हो ग हल्ली मी तुला टाळतोय खरा पण ...
मी तुला विसरू शकतो ना तुझ्या आठवणींना
स्नेहासिकत सानिध्यात घालवलेल्या त्या क्षणांना
हसऱ्या , ओल्याचिंब आठवणींना अन तुझ्या प्रेमाला

